अननस ( pineapple) वनस्पतीचे आयुर्वेदिक औषधी महत्वAnanas vanaspti vishyi ayurvedic aushadhi mahiti
• विविध भाषेत नाव :
• मराठी : अननस.
• हिंदी : अननास.
• संस्कृत : बहुनेत्रफळ / अननास.
• Scientific name : Ananas comosus.
• कुळ : Bromeliaceae
• वनस्पती चे वर्णन ( plant Discription )
• पाने : लांब टोकदार व काटेरी कडा असलेली हिरव्या किंवा थोडी लालसर झाक असलेली. जाड पाने असतात. एखाद्या गुच्छा सारखी दिसतात. पाणी संचय करतात.
• खोड : अतिशय लहान जमिनीलगत असून त्याभोवती पानांचा गुच्छ असतो.
• फळ : बाहेरून खडबडीत जाड साल असलेलं. त्यावर डोळ्यांसारखी नक्षी असते. त्यामुळे त्याला बहुनेत्रफळ म्हणतात. आतील गर पिवळसर, रस असलेल, आंबट गोडसर असते. अनेक फुलांच्या संयोगाने बनते.
• आयुर्मान : ही एक बहु वर्षीय वनस्पती आहे.
• लागवड केल्यावर बारा ते अठरा महिन्यांत फुल येते. तर अठरा ते चोवीस वर्षात फळे लागतात. एका झाडावर साधारण एक फळ येते.
• उत्पती व लागवड : मूळ दक्षिण अमेरिकेतील फळ आहे. अनेक देशात लागवड केली जाते. भारतात देखील मोठ्या प्रमाणात पिक घेतात.
• गुणधर्म :
• कॅल्शियम २० mg • फॉस्फरस ९ mg
• नियासिन ०.१mg • तंतुमय ०.५
• थायमीन ०.२० mg • मेद ०.१
• क जीवनसत्व ३९ mg • आद्रता ८७.८ %
• पिष्टमय पदार्थ १०.८% • रायबोफ्लेविन ०.२ mg
• खनिजे ०.४ • कॅरोटीन १८ mg
• देठातील पिष्टमय पदार्थ पिकण्यापूर्वी साखरेचे रुप घेऊन फळात येतात. त्यामुळे फळात पिष्टमय पदार्थ नसतो.
• फळाची साल रफेज या तंतुमय पदार्थामुळे फळाची साल जाड असते. त्यामुळे किड व जंतू आत शिरू शकत नाहीत.
• अननसाचे औषधी महत्व :
• ब्रोमेलाईन नावाचे एंझाईम असते. त्यामुळे अन्न पचन व शरीराच्या पोषणास अननस उपयुक्त आहे.
• आम्ल व अल्कलीचा समतोल राखते.
• प्रोटीन जेवण जसे अंडी, मास, खाल्यावर अन्न पचनास मदत व्हावी यासाठी अननस खाणे उपयुक्त आहे.
• क्लोरिन असल्याने शरीरातील विषद्रव्ये मूत्रपिंड क्रिया सुधारून मूत्र विसर्जन क्रिया सुलभतेने बाहेर काढते.
• शरीरातील क जीवनसत्व वाढवण्यासाठी मदत करते. त्यामुळे दाताच्या हिरड्या मजबूत होतात. तसेच सर्दी, ताप यामध्ये फायदेशीर अननस खाणे आहे. तसेच त्वचा सैल करते.
• व्हिटॅमिन A.B6,C या फळात असते. संधिवात वेदना कमी करते.
• वजन कमी करण्यासाठी मदत होते. कारण यात कोलेस्टेरॉल कमी असते. त्यामुळे हृदयासाठी फायदेशीर आहे. रक्ताभिसरण सुधारते. पोटॅशियम घटक असल्याने ब्लडप्रेशर नियंत्रित ठेवते.
• अननस खाल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ब्रोमोलीन नावाचे यातील द्रव्य कर्करोग ( कॅन्सर) पेशी वाढ रोखते. यामुळे कर्क रोग कमी करण्यासाठी त्यापासून दूर ठेवण्यासाठी मदत करते.
• केसांचे आरोग्य सुधारणेसाठी व त्वचा आरोग्य सुधारण्यासाठी अननस उपयुक्त आहे.
• अननस खाताना घ्यायची काळजी :
• जास्त प्रमाणात अननस खाल्यास अतिसार, उलट्या होऊ शकतात. दिवसातून एक कप ज्यूस किंवा २०० ग्रॅम पेक्षा जास्त खाऊ नये.
• अननस अलर्जी असेल तर तोंड येणे, फोड येणे, जिभेला सूज, तोंडाला खाज अशा समस्या उद्भवू शकतात.
• फ्रुकटोज म्हणजे साखरेचे प्रमाण जास्त असल्याने मधुमेह असलेल्या रुग्णांनी वैद्यकीय सल्याने अननस खावे.
• ब्रोमोलिन व ट्रिप्सन असल्याने गर्भवती स्त्रियांनी अननस खाऊ नये. गर्भपात होऊ शकतो.
• ऍसिडीटी असलेल्यांनी कमी प्रमाणात खावे.
• अशी आहे अननस या फळाचे औषधी महत्व ananas vanaspti vishyi ayurvedic aushadhi mahiti marathi madhe •



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
ही माहिती शैक्षणिक व सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. कृपया वैद्यकीय सल्ल्यासाठी तज्ञांचा सल्ला घ्या.