• नाव :
• मराठी नाव : सुवर्णक्षीरी, काटेधोत्रा, पिवळा धोत्रा, सत्यानाशी विलायती.
• हिंदी नाव : सत्यानाशी, विलायती. पिला धतुरा.
• संस्कृत नाव : सुवर्णक्षीरी, कांचनक्षीरी,
• इंग्रजी नाव : Mexican poppy.
• शास्त्रीय नाव : Argemone mexicana.
• कुळ ( family) : papaveraceae
• वनस्पती वर्णन :
ही एक काटेरी, औषधी व तण स्वरूपात आढळणारी वनस्पती असून ती भारतात रस्त्याच्या कडेला, शेतात आणि मोकळ्या जागेत सहज आढळते.
• मुळे : सोटमुळ पद्धतीची पिवळ्या रंगाची, जमिनीत खोलवर गेलेली मुळे आढळतात.
• खोड : हिरवट पांढरे, काटेरी आणि रसयुक्त तोडल्यास पिवळा दुधी रस बाहेर पडतो. या रसामुळे त्यास सुवर्ण क्षीर असे म्हणतात.
• पाने : हिरवट रंगाची पांढऱ्या शिरा असलेली, कडेला काटे असलेली आकाराने मोठी खोडाला चिकटलेली असतात.
• फुले : आकर्षक पिवळसर रंगाची पाच ते सहा पाकळ्या असणारी फुले असतात. एक एकटी उमलतात. व वर्षभर येतात.
• फळे : काटेरी शेंगेसारखी बोंडे या झाडाला लागतात. त्यामध्ये लहान लहान मोहरीसारख्या बिया असतात. फळ पिकले की तडा जाऊन त्या आजुबाजूला विखुरतात. व त्यांचा बीजप्रसार होतो.
• औषधी महत्व :
• त्वचा रोग असेल, फंगल इन्फेक्शन असेल, खाज , खुजली असेल तर या वनस्पतीच्या पानांतील रस काढून त्यावर लावल्यास त्वचारोग बरा होतो.
• शरीरावर जखम झाली असेल तर पानातून व खोडातून निघणारा पिवळा रस लावतात. जखम बरी होते.
• याच्या बियांचे तेल कीडनाशक म्हणन वापरतात.
• पोटातील जंत काढण्यासाठी बिया खातात.
• शरीरात उष्णता वाढली असेल, मूळव्याध असेल तर याच्या मुळी बारीक कट करुन त्याचा उकडून काढा करुन बाटलीत भरला जातो. व रोज एक चमचा घेत राहिल्यास शरीरातील उष्णता बाहेर काढून टाकते. व मूळव्याध बरा करते.
• मुक्का मार लागल्यास पाने चेचून त्याचा रस लावावा. लेप लावावा. आराम मिळतो.
• विंचू चावला असेल तर पाने चेचून लावा. दंश वेदना कमी होतात.
• काविळ रोगात मुळ्या धुवून त्याचा तुकडा विड्याच्या पानांसोबत खाणे लाभकारी असते.
• डोळे दुखत असतील तर याची फुले कुसकरून त्याचा लेप डोळ्यांच्यावर लावला जातो.
• जंतू संसर्ग, डोळ्यात समस्या निर्माण झाल्यास फुलांच्या पाकळ्या वाटून तुपात मिसळून लावतात.व्हायरस इन्फेक्शन, बॅक्टेरिया इन्फेक्शन झाल्यास याच्या मुळांचा काढा करुन पितात. इन्फेक्शन दूर होते.
• नपुंसकता घालवण्यासाठी मूळे घेऊन ती वळवून चूर्ण करुन अर्धा चमचा झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दुधात घालून प्या सलग पंधरा दिवस एक दिवस आड पिल्यास लाभ होतो.
• जखम, फोड यावर याच्या पानांतील व खोडातून निघालेले पिवळसर दूध लावतात. फोड बरे होतात.
• सूचना :
काही भागात या वनस्पतीस विषारी वनस्पती म्हणून ओळखले जाते. तिच्या बिया विषारी आहेत म्हटले जाते. तेव्हा कोणतीही वनस्पती औषधी आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणे फायद्याचे असते. आपणही ही वनस्पती वापरत असताना आपल्या जवळील आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणे फायद्याचे असते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
ही माहिती शैक्षणिक व सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. कृपया वैद्यकीय सल्ल्यासाठी तज्ञांचा सल्ला घ्या.