अबोली वनस्पती/ Aboli vanaspti
• अबोली वनस्पती एक लहान झुडूप असून त्याची फुले ही गजरा, सजावट करण्यासाठी वापरतात. त्याची लागवड कुंडीत, बागेत केली जाते.
नाव :
मराठी नाव : अबोली.
हिंदी नाव : प्रियदर्शनी, अबोली.
इंग्रजी नाव : Firecracker Flower / Crossandra.
संस्कृत नाव : प्रियदर्शनी, अभिरामा.
शास्त्रीय नाव : Crossandra infundibuliformis.
कुळ : Acanthaceae.
वनस्पतीचे वर्गीकरण :
हे एक फुलझाड आहे.
मुळे : तंतुमय मुळे असतात.
खोड : लहान काटक्यांसारखी खोडे अनेक काड्यांसारखी असतात. कोवळी असताना हिरव्या रंगाची अन जून झाल्यावर राखाडी रंगाची दिसतात.
पान : साधे पान असते. लांब मध्यभागी बाकदार वळण अंडाकृती असलेले असते.
फुले : झाडाला भगवी, गुलाबी, निळा अशी निरनिराळे रंग असणारी फुले या झुडपाला लागतात. तीन ते चार दले ती ही जोडलेली असतात.
फळे : या वनस्पतीस गव्हाच्या पिकासारख्या ओंब्या येतात. सुरवातीला फुले येतात. त्या खाली ओंब्या मध्ये काळया रंगाच्या बिया तयार होतात. पाऊस पडू लागला की तड तड फटाकडी सारखी वाजून बाजूला पडतात. म्हणून फायर क्रॅकर नाव पडलेले आहे.
• लागवड : याच्या फांद्या पासून तसेच बियांपासून लागवड केली जाते.
• अबोलीचे औषधी महत्व उपयोगिता :
• फुलांची औषधी पेस्ट तयार करून त्वचा विकारावर वापरली जाते.
• सालीचे तेल काढून किंवा पेस्ट तेलात शिजवून ते जखमेवर लावले जाते. जखमा बऱ्या करते.
• फुले ऐन्ट्री ऑक्सिडेंट असल्याने शरीरावरील सूज घालवण्यासाठी पेस्ट करुन लावतात. तसेच गळा संसर्ग, सर्दी, यासाठी फुले पाने यांची पेस्ट तेलात शिजवून ते तेल लावल्यास आराम मिळतो.
• शारीरिक व मानसिक तणाव कमी करण्यासाठी तसेच उत्प्रेरक म्हणून फुले व त्यांची पेस्ट तेलात शिजवून मालिश करतात. तसेच श्वसन मार्ग नीट करण्यासाठी तेल वापरले जाते. गळ्यावर मालिश तेलाने करतात.
• फुले गजरा व सजावटीसाठी सुद्धा वापरली जातात.
• अशी आहे अबोली वनस्पतीविषयी आयुर्वेदिक माहिती Aboli vanaspti vishyi ayurvedic aushadhi mahiti


