अळीव धान्य खाण्याचे फायदेAliv dhany khanyache fayde
नाव :
• मराठी नाव : अळीव / हळीम / हळीव
• हिंदी नाव : हलीम / चंद्रशूर
• इंग्रजी नाव : Garden seeds.
• संस्कृत नाव : चंद्रशूर.
• शास्त्रीय नाव : Lepidium sativam.
• वनस्पतीचे वर्गीकरण :
• कुळ : Brassicaceae ( मोहरी)
• आयुष्य : वार्षिक.
• उपयोग : धान्य, औषध व पोषक आहार.
• मूळ देश : इथिओपिया.
• खोड : हिरव्या रंगाचे असून वीस ते साठ सेमी पर्यंत वाढते. एक रोप असते.
• पाने : लहान असतात. थोडी वाकलेली. हिरवा रंग असतो. चवीला तिखट असतात.
• फुले : लहान पांढरी गुच्छात येणारी असतात.
• मूळ : तंतुमय असतात.
• फळे : लहान चपटी असतात. त्यामध्ये लहान बिया असतात. त्यालाच अळीव धान्य म्हणतात. याच बिया पाण्यात टाकल्यास बुळबुळीत होतात. त्यांचा वापर आहारात केला जातो.
• घटक : दहा ग्रॅम मागे पौष्टिकता
• प्रथिने (प्रोटीन ) – २.५ %
• चरबी(फॅट) – २.४५ %
• सेल्युलोज ( फायबर ) - ०.७ %
• कर्बोदके (कार्बोहायड्रेट्स ) - ३.३ %
• ऊर्जा ( एनर्जी ) ४५%
• अळीव धान्याचे औषधी महत्त्व :
• अळीव खाल्याने शरीरातील लोहाचे प्रमाण वाढते. हिमोग्लोबीन वाढल्याने शरीर तंदुरुस्त राहते.
• शरीरातील हार्मोन्स संतुलित ठेवते. विशेषत स्त्रियांना मासिक पाळीत होणारा त्रास दूर करते. हार्मोन्स बिघाड सुधारते.
• बाळंतीण स्त्रीस दूध वाढवण्यासाठी मदत करते. अळीव लाडू किंवा खीर देणे चांगले असते. दुधाची गुणवत्ता वाढते. बाळास व आईस कॅल्शियम व आयर्न वाढून ऊर्जा देते.
• त्वचा विकार व केस आरोग्य सुधारते. व्हिटॅमिन ई व मॅग्नेशियम व प्रोटीन असल्याने केसांची वाढ होते. केस घनदाट होतात. तोंडावर शरीरावरील डाग, ओरखडे घालवते. रक्त प्रमाण वाढवते. त्यामुळे वांगाचे डाग, मुरुमे, डाग कमी करते. केस चमकदार बनवते.
• लघु हलके दीपन पाचन व सेल्युलोज असल्याने पचन सुधारते. व पोटाचे विकार कमी करुन पोट साफ करण्यास मदत करते. अपचन त्रास गॅसेस कमी करते. मल निस्सारण नीट करते.
• कॅन्सर रोगात, कॅन्सरच्या पेशी कमी करुन आरोग्य सुधारण्यासाठी मदत करते.
• रॅपिडॉनिक व लेनोलेनिक आसिड असल्याने स्मरणशक्ती वाढवते. बुद्धी तेज करते.
• दमा त्रास असेल, श्वसन रोग विशेषत सर्दी, कफ, घसा खवखव कमी करते. कफ निस्सारन करते. श्वास कोंड दूर करुन आवाज नीट करते.
• शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करते. व गुड कोलेस्टेरॉल वाढवते.
• वात दोष असेल. सांध्यातील जोडात असलेल्या पातळ गादीतील वंगण पदार्थ वाढवून सांध्यांचे आरोग्य सुधारते. कटकट आवाज कमी करते. कॅल्शियम वाढवते.
• स्त्रियांची गर्भाशय शुद्ध करुन पाळी नीट करते. व पुरुषात शुक्राणू वाढ तसेच त्यांची गुणवत्ता सुधारते.
• कसे खावे :
• अळीव धान्याचा लाडू किंवा खीर करुन खाणे लाभदायक आहे.
• सात ते दहा ग्रॅम आठवड्यातून दोन ते तीनवेळा खा लाभदायक आहे.
• सात ते आठ दाणे खाऊन प्रथम चाचपणी करा. नंतर प्रकृती नुसार खाणे चांगले.
• कोशंबीर किंवा स्यालेड वर भिजवून टाकून खावे.
• लाडू करताना गुळ,खोबरे, तूप, नारळपाणी घालून बनवून खाणे लाभकारी असते.
• अळीव कोणी खावू नये?
• जास्त प्रमाणात खाल्यास लघवी तक्रारी, उन्हाळे लागणे या समस्या निर्माण होतात. उष्णता असलेल्यानी मर्यादेत खाणे चांगले.
• गरोदर अवस्थेत स्त्रियांनी खाऊ नये. गर्भपात होऊ शकतो.
• थायरॉईड असेल तर कमी खावे. किंवा वैद्यक सल्ला घ्यावा.
• उन्हाळ्यात कमी खावे. थंडीत खाणे लाभकारी असते.
• बॉडी व प्रकृती नुसार सुरवातीस सात ते आठ दाणे खाऊन पहा. प्रकृती स्वस्त्यानुसार खाणे चांगले.
• सूचना : कोणतेही धान्य व औषध आपली कफ, पित्त, वात प्रकृती दोष पाहून डॉक्टर अथवा वैद्यक सल्ला घेऊन खाणे लाभकारी असते.
• अशी आहे अळीव धान्याची औषधी माहिती . • Aliv dhany khanyache fayde





