अळूकुडी.colocasia लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अळूकुडी.colocasia लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २३ मे, २०२६

आळू वनस्पती विषयी आयुर्वेदिक माहिती Aalu vanaspati vishyi ayurvedic aushadhi mahiti

 

आळू वनस्पती विषयी आयुर्वेदिक माहिती
Aalu vanaspati vishyi ayurvedic aushadhi mahiti
आळू वनस्पती विषयी आयुर्वेदिक माहिती  Aalu vanaspati vishyi ayurvedic aushadhi mahiti


• ओळख :

 आळू ही वार्षिक वनस्पती असून ती पावसाळी दिवसात उगवते. ती एक कंद वर्गीय असून तिची पाने आहारात वापरली जातात. त्यापासून आळूवडी, गरगटे सूप बनवले जाते. त्यास घाट भागात फदफदे आमटी म्हणतात.

नाव :

• मराठी नाव : आळू, अळूकुडी.

• हिंदी नाव : घुईयां.

• इंग्रजी नाव : Taro, Elephant Ear plant.

• संस्कृत नाव : आलुकी, कच्छू, कचूर.

• शास्त्रीय नाव : colocasia , esculenta.

• कुळ ( family) : Araceae.

• आढळणारे देश :

भारत, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश व उष्ण कटिबंधीय दमट हवामान असलेले देश याठिकाणी आपल्याला अळू पहायला मिळतो.

आळू वनस्पती विषयी आयुर्वेदिक माहिती  Aalu vanaspati vishyi ayurvedic aushadhi mahiti


वनस्पती रचना :

• मुळे : या वनस्पतीची मुळे तंतुमय मुळे प्रकारची असतात. जमिनीत पसरून वनस्पतीस आधार देतात. व अन्न पुरवतात.

• खोड : एक कंद स्वरूपाचे असून हिरवे किंवा काळे असते. अन्नसाठा करणे, नवीन रोप निर्मिती करणे. याच खोडापासून करतात.

• पाने : मोठ्या आकाराची हृदयकृती ढालीसारखी असतात. रंग हिरवा असतो. पानावर मेणासारखा चिकट द्रव असतो. त्यामुळे पानावर पाणी थांबत नाही. याचे देठ लांब व मासल असतात.

• फुले : लहान पिवळसर व फिकट रंगाची असून याचा जो पुष्पबंध असतो. त्यास स्पिंडिक्स (spadix) म्हंटले जाते. त्याभोवती स्पेथ( spathe) नावाचे आवरण असते. फुलोरा फारसा आकर्षक नसतो.

• फळे : लहान बेरी सारखी फळे येतात. पिकून फुटते. त्यातील बिया विखरून बीज प्रसार दूरपर्यंत होतो. तसेच कंदास कंद उठून वाढते. व पसरते.

आळू वनस्पती विषयी आयुर्वेदिक माहिती  Aalu vanaspati vishyi ayurvedic aushadhi mahiti


आळू मधील औषधी गुण :

• व्हिटॅमिन A,B,C, कॅल्शियम, पोटॅशियम, आंटिऑक्सिडंट, लोह, तांबे, जस्त ,फॉस्फरस, कार्बोहायड्रेट्स असते.

आळूचे औषधी महत्व :

• सांधेदुखी असेल तर रोज आळू खावा.

• फायबर असल्याने वजन कमी करण्यास मदत होते.

• पोट समस्या, साफ होत नसेल. तर आळू खाणे फायद्याचे असते.

• शरीरात ऊर्जा वाढवण्यासाठी अळू मदत करतो.

• व्हिटॅमिन A असल्याने डोळ्यांचे आरोग्य तसेच मांसपेशी तंदुरुस्त ठेवतो.

• कॅल्शियम असल्याने हाडे मजबूत ठेवण्यासाठी मदत करतो.

• आयर्न घटक असल्याने रक्त वाढीसाठी आळू पोषक आहे.

• रक्तक्षय कमी करण्यासाठी मदत करतो.

• ताप आल्यास आळू खा. ताप कमी करण्यासाठी मदत होते.

• शरीरातील गुड कोलेस्टेरॉल वाढवतो आणि बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी मदत करतो.

• दूध कमी असेल तर बाळंतिणीनी आळू खाल्यास दूध वाढीस मदत करतो.

• व्हिटॅमिन सी असल्याने जखमा लवकर भरण्यासाठी मदत करतो

• वात, कफ, पित्त यावर परिणाम कारक असतो. थंड प्रकृती असल्याने आरोग्यास लाभदायक आहे.

• विषारी कीटक चावल्यास वेदना कमी करण्यासाठी आळू पानांचा वाटून चोथा लावतात. वेदना कमी होतात. तसेच रस प्यावा. लाभकारी असते.

• आळू कोणी खावू नये ?

• मधुमेह असल्यास खाणे टाळावे.

• दमा त्रास असेल तर आळू खावू नये.

आळू वनस्पती विषयी आयुर्वेदिक माहिती  Aalu vanaspati vishyi ayurvedic aushadhi mahiti


आळूचे सेवन कसे करावे?

• अळू पानात कॅल्शियम स्पटिक असते. खाज निर्माण करणारे घटक असतात. त्यामुळे अळू कच्चा न खाता शिजवून खाणे लाभकारी असते.

• अळूची पाने देठासहित घेऊन त्यास धुवून चिरून ती गरम पाण्यात शिजवून त्यापासून गरगटे करुन खा. हे करताना आमसूल टाकून करणे चांगले.कारण अळूस खाज असते.

• अळूवडी बनवून देखील खातात.

• लागवड : उष्ण व दमट हवामान तसेच मध्यम व भरपूर पाणी असलेल्या भागांतील सुपीक व सेंद्रिय खत असलेल्या जमिनीत अळू चांगला येतो.

• टीप : कोणतीही औषधी वनस्पती सेवन करताना आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणे फायद्याचे असते. आपली प्रकृती, विकार पाहून ती खावी की खावू नये हे ठरवणे लाभकारी असते.

• अशी आहे अळू वनस्पती विषयी आयुर्वेदिक माहिती.alu vanspti vishyi ayurvedic aushadhi mahiti


Aloe Vera Plant Information in English | Benefits, Uses and Ayurvedic Properties

🌿 Aloe Vera Plant Information in English | Benefits, Uses and Ayurvedic Properties ✨ Introduction Aloe Vera, known as Korphad in Marathi a...