अशोकवृक्षाची आयुर्वेदिक औषधी माहिती Health benefits of Ashok tree लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अशोकवृक्षाची आयुर्वेदिक औषधी माहिती Health benefits of Ashok tree लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २७ जून, २०२६

अशोकवृक्षाची आयुर्वेदिक औषधी माहिती Health benefits of Ashok tree

 अशोकवृक्षाची आयुर्वेदिक औषधी माहिती
Health benefits of Ashok tree.
अशोकवृक्षाची आयुर्वेदिक औषधी माहिती Health benefits of Ashok tree


• नाव :

• मराठी नाव : अशोक.

• हिंदी नाव : अशोक, सीता अशोक,

• इंग्रजी नाव : Ashoka Tree , sorrowless tree .

• संस्कृत नाव : अशोक, हेमपुष्प, ताम्रपल्लव, अपशोक.

• शास्त्रीय नाव : saraca asoca.

• कुळ ( family) : Fabaceae,( caesalpiniaceae.)

वनस्पती वर्णन :

हा वृक्ष नेहमी सदा हरित आहे.

• उंची : 

या वृक्षाची सरासरी उंची ही ६ ते १० मीटर आहे. कधीकधी १५ मीटर पर्यंत उंच असतो.

• स्थान : 

भारत, श्रीलंका, व दक्षिण आशिया खंडातील मूळ वृक्ष आहे. बागेत, मंदिर परिसरात रस्त्याच्या कडेला विशेषत लावला जातो.

• पाने : 

संयुक्त पाने प्रकारात, पानांची लांबी १५ ते २५ से. मी. असते. कोवळी, तांबूस, तपकिरी रंगाची कोवळी असताना दिसतात. जून झाल्यावर घनदाट हिरवी व चकाकणारी असतात. गुळगुळीत व लांब असतात.

अशोकवृक्षाची आयुर्वेदिक औषधी माहिती Health benefits of Ashok tree


• फुले : 

गुच्छ स्वरूपात असणारी, प्राथमिक अवस्थेत पिवळया, केसरी, नंतर नारिंगी ते लालसर रंगाची होतात. सुगंधी व आकर्षक असतात. फुलांना पाकळ्या नसतात. रंगीत दलपुंज सुंदर दिसतो. फुले विशेषत फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात येतात.

• फळे : 

दहा ते वीस सेमी लांबीच्या शेंगा असतात. सुरवातीस हिरव्या तर पिकल्यावर तपकिरी रंगाच्या होतात. साधारण एका शेंगेत ७ ते ८ बिया असतात.

• खोड :

 सरळ उंच जाणारे व मजबूत असते.

• साल :

 गडद तपकिरी किंवा राखाडी वरून दिसते. आतील बाजूस लालसर तपकिरी असून औषधी म्हणून सालीचा उपयोग होतो.

• मूळ : 

सोटमूळ प्रकारचे मूळ असते. बाजूला अनेक उपमुळे असतात. जमिनीत घट्ट धरून ठेवतात.

• सालीमध्ये असणारे घटक : 

टॅनिन,फ्लॅव्होनॉइड्स, सॅपोनीन , ग्लायकोसाइड्स,फिनॉलिक संयुगे, कॅटेचॉल.

अशोकवृक्षाची आयुर्वेदिक औषधी माहिती Health benefits of Ashok tree


अशोक वृक्षाचे औषधी महत्व :

• स्त्री समस्या : शरीरावर पांढरे जाणे, मासिक पाळी वेळेत न होणे, हार्मोन्स इन बॅलन्स असेल तर अशोकारिष्ट औषधी खाणे उपयुक्त आहे. सालीचे चूर्ण देखील खाणे लाभकारी आहे.

• लहान मुलांच्या बुद्धिमत्तेत वाढ करण्यासाठी उपयुक्त आहे.

• मुतखडा झाला असल्यास अशोक साल चूर्ण व मध एकत्रित सेवन करत रहावे. किंवा साल पावडर पाण्यात टाकून उकळून काढा करुन पिणे लाभकारी असते.

• मधुमेह असेल तर सालीचे चूर्ण व दूध उपाशीपोटी घेत राहिल्यास वाढलेली साखर नियंत्रणात येते. इन्सुलिन वाढवते.

• व्हायरल इन्फेक्शन झाले असेल तर ते नियंत्रणात आणते.

• त्वचारोग असेल, एखादे फंगल इन्फेक्शन असेल तर ते कमी करण्यास मदत करते. रक्त शुद्ध करुन त्वचेवर निखार आणते.

• हाडांमध्ये फॅक्चर असेल. तर ती जोडतात. हाडांची मोडतोड जोडून त्यांची वाढ करतात.

• अनावश्यक विषारी घटक शरीरातील काढून टाकून शरीर शुद्ध करण्यासाठी मदत करते.

• कॅन्सरपासून वाचवण्यासाठी उपयुक्त अशोकाची साल मदत करते.

• जखम भरुन काढण्यासाठी तसेच सूज कमी करण्यासाठी अशोक साल उपयुक्त आहे.

• अतिसार व मूळव्याध रोगात उपयुक्त आहे. शरीरात थंडावा निर्माण करतो.

• वैशिष्ट्ये : शोभिवंत, पवित्र असा वृक्ष असून याच्या फुलाचा रंग बदलत जातो. हे याचे खास वैशिष्ट्य आहे. मधमाशा व फुलपाखरे यांना आकर्षित करतो. सावली देणार व प्रदूषण सहन करतो.

अशोकवृक्षाची आयुर्वेदिक औषधी माहिती Health benefits of Ashok tree


अशोक वृक्षाचा औषधी वापर कसा करावा?

• याची साल पावडर मधासवे किंवा त्याचा उकळून काढा उपाशीपोटी घ्यावा.

• बाजारात याच्या सालीची पावडर तसेच अशोकारिष्ट उत्पादने उपलब्ध असतात. याचे काही साइड इफेक्ट होऊ नये यासाठी आपली वात, कफ, पित्त प्रकृती तपासून आयुर्वेदिक वैद्याच्या सल्याने खाणे योग्य आहे.

• अशी आहे अशोक वृक्षाची आयुर्वेदिक औषधी माहिती Health benefits of Ashok tree.


Aloe Vera Plant Information in English | Benefits, Uses and Ayurvedic Properties

🌿 Aloe Vera Plant Information in English | Benefits, Uses and Ayurvedic Properties ✨ Introduction Aloe Vera, known as Korphad in Marathi a...